रविवारी ऑक्टोबर 11, 2026
“मग मी आकाशातून एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तारण, सामर्थ्य, आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्याख्रिस्ताचा अधिकार ही आली आहेत.”
“And I heard a loud voice saying in heaven, Now is come salvation, and strength, and the kingdom of our God, and the power of his Christ.”
1. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.
2. माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
3. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो.
4. देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो.
6. खी झाले आहेत त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो.
19. देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो.
20. देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता.
21. परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा.
22. परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
1. Bless the Lord, O my soul: and all that is within me, bless his holy name.
2. Bless the Lord, O my soul, and forget not all his benefits:
3. Who forgiveth all thine iniquities; who healeth all thy diseases;
4. Who redeemeth thy life from destruction; who crowneth thee with lovingkindness and tender mercies;
6. The Lord executeth righteousness and judgment for all that are oppressed.
19. The Lord hath prepared his throne in the heavens; and his kingdom ruleth over all.
20. Bless the Lord, ye his angels, that excel in strength, that do his commandments, hearkening unto the voice of his word.
21. Bless ye the Lord, all ye his hosts; ye ministers of his, that do his pleasure.
22. Bless the Lord, all his works in all places of his dominion: bless the Lord, O my soul.
धडा उपदेश
13 वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो.
13 Like as a father pitieth his children, so the Lord pitieth them that fear him.
1 ह्यावेळेस, हिज्कीया फार आजारी पडला. जवळ जवळ तो मेलाच होता. अमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याला भेटायला गेला.यशया राजाला म्हणाला, परमेश्वराने मला तुला सांगायला सांगितले आहे तू लवकरच मरशील, म्हणून तू गेल्यावर तुझ्या घरातील लोकांनी काय करावे हे तू त्यांना सांगावेस. तू ह्या आजारातून उठणार नाहीस.
2 हिज्कीया मंदिराच्या दिशेला वळला आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरवात केली. तो म्हणाला,
3 परमेश्वरा, मी नेहमीच शुध्द मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या. मग हिज्कीया कळवळून रडू लागला.
4 यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला,
5 हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु: खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन.
9 आजारातून उठल्यावर हिज्कीयाने लिहिलेले हे पत्र:
12 माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला. जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते, तसा मी संपलो आहे. तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस.
20 मी म्हणतो, परमेश्वराने माझे रक्षण केले.
1 In those days was Hezekiah sick unto death. And Isaiah the prophet the son of Amoz came unto him, and said unto him, Thus saith the Lord, Set thine house in order: for thou shalt die, and not live.
2 Then Hezekiah turned his face toward the wall, and prayed unto the Lord,
3 And said, Remember now, O Lord, I beseech thee, how I have walked before thee in truth and with a perfect heart, and have done that which is good in thy sight. And Hezekiah wept sore.
4 Then came the word of the Lord to Isaiah, saying,
5 Go, and say to Hezekiah, Thus saith the Lord, the God of David thy father, I have heard thy prayer, I have seen thy tears: behold, I will add unto thy days fifteen years.
9 The writing of Hezekiah king of Judah, when he had been sick, and was recovered of his sickness:
12 Mine age is departed, and is removed from me as a shepherd’s tent:
20 The Lord was ready to save me:
1 आम्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली?
1 Who hath believed our report? and to whom is the arm of the Lord revealed?
14 मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
14 And Jesus returned in the power of the Spirit into Galilee:
12 तो एका खेड्यात जात असताना, कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला भेटले, ते दूर उभे राहीले.
13 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, येशू, गुरुजी आम्हांवर दया करा!
14 जेव्हा त्याने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणाला, जा, आणि स्वत: ला याजकांना दाखवा. ते जात असतानाच बरे झाले,
15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की, आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुति केली.
16 तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला. आणि त्याने त्याचे उपकार मानले. तो शोमरोनी होता.
17 येशू त्याला म्हणाला, दहाजण बरे झाले नव्हते काय? नऊजण कोठे आहेत?
18 या विदेशी माणासाशिवाय कोणीही देवाची स्तुति करण्यासाठी परत आला नाही काय?
19 येशू त्याला म्हणाला, ऊठ, आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.
12 And as he entered into a certain village, there met him ten men that were lepers, which stood afar off:
13 And they lifted up their voices, and said, Jesus, Master, have mercy on us.
14 And when he saw them, he said unto them, Go shew yourselves unto the priests. And it came to pass, that, as they went, they were cleansed.
15 And one of them, when he saw that he was healed, turned back, and with a loud voice glorified God,
16 And fell down on his face at his feet, giving him thanks: and he was a Samaritan.
17 And Jesus answering said, Were there not ten cleansed? but where are the nine?
18 There are not found that returned to give glory to God, save this stranger.
19 And he said unto him, Arise, go thy way: thy faith hath made thee whole.
17 असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गालील, यहूदीया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता.
18 काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
19 परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना. ते छपरावर गेले, आणि त्याला खाटेसाहित आत सोडले, कौले काढून बरोबर मध्यभागी जेथे येशू बसला होता तेथे सोडले.
20 त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला, मनुष्या, तुइया पापांची क्षमा झाली आहे!
21 नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुशी स्वत: शी विचार करु लागले: हा कोण आहे, जोे असे दुर्भाषण करीत आहे? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करु शकतो?
22 पण येशू विचार जाणून होता, तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपल्या अंत: करणात असा विचार का करता?
23 तुुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ किंवा ऊठ आणि चालू लाग’ यांतील कोणते म्हणणे सोपे आहे?
24 पण तुम्हांला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. तो अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो ऊठ, आपला बिछाना उचल आणि घरी जा.
25 ताबडतोब तो उभा राहिला, ज्या बिछान्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुति करीत आपल्या घरी गेला.
26 आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले, आणि देवाची स्तुति करु लागले, ते खरोखरच आश्चर्यचकित झाले,
17 And it came to pass on a certain day, as he was teaching, that there were Pharisees and doctors of the law sitting by, which were come out of every town of Galilee, and Judæa, and Jerusalem: and the power of the Lord was present to heal them.
18 And, behold, men brought in a bed a man which was taken with a palsy:
19 And when they could not find by what way they might bring him in because of the multitude, they went upon the housetop, and let him down through the tiling with his couch into the midst before Jesus.
20 And when he saw their faith, he said unto him, Man, thy sins are forgiven thee.
21 And the scribes and the Pharisees began to reason, saying, Who is this which speaketh blasphemies? Who can forgive sins, but God alone?
22 But when Jesus perceived their thoughts, he answering said unto them, What reason ye in your hearts?
23 Whether is easier, to say, Thy sins be forgiven thee; or to say, Rise up and walk?
24 But that ye may know that the Son of man hath power upon earth to forgive sins, (he said unto the sick of the palsy,) I say unto thee, Arise, and take up thy couch, and go into thine house.
25 And immediately he rose up before them, and took up that whereon he lay, and departed to his own house, glorifying God.
26 And they were all amazed, and they glorified God,
1 येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला…
1 And Jesus being full of the Holy Ghost …
11 ... येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता.
12 तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.
13 जेव्हा प्रभुने तिला पाहिले, त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तीला म्हणाला, रडू नकोस.
14 नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते, ते थांबले.
15 तेव्हा येशू म्हणाला, तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ! आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले.
16 ते सर्व भयचकित झाले, त्यांनी देवाचे गौरव केले; ते म्हणाले, आमच्यामध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे. आणि म्हणाले, देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे!
11 …went into a city called Nain; and many of his disciples went with him, and much people.
12 Now when he came nigh to the gate of the city, behold, there was a dead man carried out, the only son of his mother, and she was a widow: and much people of the city was with her.
13 And when the Lord saw her, he had compassion on her, and said unto her, Weep not.
14 And he came and touched the bier: and they that bare him stood still. And he said, Young man, I say unto thee, Arise.
15 And he that was dead sat up, and began to speak. And he delivered him to his mother.
12 मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो.
28 मी जोते आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे.
29 मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.
31 परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो. चला आता, आपण निघू या.
12 Verily, verily, I say unto you, He that believeth on me, the works that I do shall he do also; and greater works than these shall he do; because I go unto my Father.
28 If ye loved me, ye would rejoice, because I said, I go unto the Father: for my Father is greater than I.
29 And now I have told you before it come to pass, that, when it is come to pass, ye might believe.
31 But that the world may know that I love the Father; and as the Father gave me commandment, even so I do. Arise, let us go hence.
1 देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रषित होण्याकरिता निवडलेला, मी पौल आणि बंधु सोस्थनेस यांजकडून.
1 Paul, called to be an apostle of Jesus Christ through the will of God,
51 पाहा! मी तुम्हांला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.
52 क्षणात, डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल, कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ.
53 कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे.
54 जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल.“विजयात मरण गिळले गेले आहे.
51 Behold, I shew you a mystery; We shall not all sleep, but we shall all be changed,
52 In a moment, in the twinkling of an eye, at the last trump: for the trumpet shall sound, and the dead shall be raised incorruptible, and we shall be changed.
53 For this corruptible must put on incorruption, and this mortal must put on immortality.
54 So when this corruptible shall have put on incorruption, and this mortal shall have put on immortality, then shall be brought to pass the saying that is written, Death is swallowed up in victory.
15 सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले: जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.
15 The kingdoms of this world are become the kingdoms of our Lord, and of his Christ; and he shall reign for ever and ever.
तारण. जीवन, सत्य आणि प्रेम हे सर्वांवर श्रेष्ठ म्हणून समजले व प्रत्यक्षात आणले जाणे; पाप, आजारपण आणि मृत्यू यांचा नाश होणे.
Salvation. Life, Truth, and Love understood and demonstrated as supreme over all; sin, sickness, and death destroyed.
प्राचीन काळी ख्रिस्ताचे किंवा सत्याचे अनुयायी ख्रिश्चन धर्माचे मूल्यमापन आजारपण, पाप आणि मृत्यू यांच्यावरील त्याच्या सामर्थ्यावरून करत असत; परंतु आधुनिक धर्म साधारणपणे यांपैकी केवळ एकाच सामर्थ्याचा—म्हणजेच पापावरील सामर्थ्याचा—विचार करतात. आपण ख्रिश्चन धर्माचा प्राथमिक पुरावा म्हणून त्या अखंड वस्त्राचा, म्हणजेच संपूर्ण ख्रिस्ताचा शोध घेतला पाहिजे; कारण केवळ ख्रिस्त—जो स्वतः सत्य आहे—तोच आपल्याला याचा निर्विवाद पुरावा देऊ शकतो.
Anciently the followers of Christ, or Truth, measured Christianity by its power over sickness, sin, and death; but modern religions generally omit all but one of these powers, — the power over sin. We must seek the undivided garment, the whole Christ, as our first proof of Christianity, for Christ, Truth, alone can furnish us with absolute evidence.
येशूने आपल्या शिष्यांना जड वस्तूंऐवजी मनाच्या साहाय्याने आजारी लोकांना बरे कसे करावे, याचे मार्गदर्शन केले. त्याला माहित होते की ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान, विज्ञान आणि पुरावा हे सत्यामध्ये आहेत, जे सर्व विसंवाद दूर करतात.
Jesus instructed his disciples whereby to heal the sick through Mind instead of matter. He knew that the philosophy, Science, and proof of Christianity were in Truth, casting out all inharmony.
त्यांच्या महान जीवनकार्याचा उद्देश कालाच्या सीमा ओलांडून संपूर्ण मानवजातीचा समावेश करतो. त्याचे तत्त्व अनंत आहे आणि ते कोणत्याही एका विशिष्ट कालखंडाच्या किंवा मर्यादित अनुयायी वर्गाच्या चौकटीपलीकडे विस्तारलेले आहे. जसजसा काळ पुढे सरकेल, तसतसे शुद्ध ख्रिश्चन धर्मातील आरोग्यदायी तत्त्वांचा योग्य प्रकारे विचार केला जाईल; त्यांचा शोध घेतला जाईल व ती शिकवली जातील, आणि ती तत्त्वे वैश्विक कल्याणाच्या संपूर्ण भव्यतेसह तेजोमय होतील.
The purpose of his great life-work extends through time and includes universal humanity. Its Principle is infinite, reaching beyond the pale of a single period or of a limited following. As time moves on, the healing elements of pure Christianity will be fairly dealt with; they will be sought and taught, and will glow in all the grandeur of universal goodness.
येशूने पाप बाहेर काढण्यापूर्वी ते उघड केले आणि त्याबद्दल ताकीद दिली. … पाप, आजार आणि मृत्यू यांचा नाश कसा करायचा, हे शिकवत आणि दाखवत तो आला.
Jesus uncovered and rebuked sin before he cast it out. … He came teaching and showing men how to destroy sin, sickness, and death.
येशूने आपल्या वचनांची सत्यता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आणि त्यामुळेच त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतींना अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्याने जे शिकवले ते त्याने सिद्ध करून दाखवले. हेच ख्रिस्ती धर्माचे विज्ञान आहे. आजारी व्यक्तींना बरे करणारे आणि असत्य किंवा दोष दूर करणारे जे 'तत्त्व' आहे, ते दैवी असल्याचे येशूने सिद्ध केले.
Jesus established what he said by demonstration, thus making his acts of higher importance than his words. He proved what he taught. This is the Science of Christianity. Jesus proved the Principle, which heals the sick and casts out error, to be divine.
येशूने आपल्या वचनांची सत्यता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आणि त्यामुळेच त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतींना अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्याने जे शिकवले ते त्याने सिद्ध करून दाखवले. हेच ख्रिस्ती धर्माचे विज्ञान आहे. आजारी व्यक्तींना बरे करणारे आणि असत्य किंवा दोष दूर करणारे जे 'तत्त्व' आहे, ते दैवी असल्याचे येशूने सिद्ध केले.
If we are Christians on all moral questions, but are in darkness as to the physical exemption which Christianity includes, then we must have more faith in God on this subject and be more alive to His promises.
दहा कुष्ठरोग्यांपैकी ज्यांना येशूने बरे केले, परंतु एक देवाचे आभार मानण्यासाठी परत आला - म्हणजे, ज्याने त्याला बरे केले त्या दैवी तत्त्वाची कबुली दिली.
Of the ten lepers whom Jesus healed, but one returned to give God thanks, — that is, to acknowledge the divine Principle which had healed him.
भौतिक अडथळ्यांवर आध्यात्मिक शक्तीचे वर्चस्व असते यावर विश्वास ठेवण्यास दैवी अधिष्ठान आहे.
चमत्कार हा ईश्वरी नियमाची पूर्तता करतो, परंतु त्या नियमाचे उल्लंघन करत नाही.
There is divine authority for believing in the superiority of spiritual power over material resistance.
A miracle fulfils God's law, but does not violate that law.
जेव्हा आपण आजारी पडतो (अशी समजूत असल्याने), तेव्हा आपण औषधांच्या मागे धावतो, आरोग्याशी संबंधित तथाकथित भौतिक नियमांचा शोध घेतो आणि बरे होण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून राहतो; तरी वस्तुस्थिती अशी असते की, याच चुकीच्या समजुतीमुळे आपण स्वतःला आजारपणाच्या गर्तेत लोटलेले असते.
मानवनिर्मित प्रणाली असा आग्रह धरतात की माणसाचे आजारी पडणे, निकामी होणे, दुःख भोगणे आणि मृत्यू पावणे या सर्व गोष्टी ईश्वराच्या नियमांशी सुसंगत आहेत; पण आपण यावर विश्वास ठेवावा का? आपण अशा एखाद्या अधिकारावर किंवा मतावर विश्वास ठेवावा का, जे पूर्णत्वाविषयीच्या ईश्वराच्या आध्यात्मिक आज्ञेलाच नाकारते — आणि ज्या अधिकाराला येशूने असत्य ठरवले आहे? येशूने पित्याची इच्छा पूर्ण केली. त्याने 'भौतिक नियम' मानल्या जाणाऱ्या गोष्टींना न जुमानता, परंतु ईश्वराच्या नियमानुसार — म्हणजेच 'मनाच्या' नियमानुसार — आजार बरे केले.
When sick (according to belief) you rush after drugs, search out the material so-called laws of health, and depend upon them to heal you, though you have already brought yourself into the slough of disease through just this false belief.
Because man-made systems insist that man becomes sick and useless, suffers and dies, all in consonance with the laws of God, are we to believe it? Are we to believe an authority which denies God's spiritual command relating to perfection, — an authority which Jesus proved to be false? He did the will of the Father. He healed sickness in defiance of what is called material law, but in accordance with God's law, the law of Mind.
देव हा "अशा शुद्ध दृष्टीचा आहे की तो वाईटाकडे पाहू शकत नाही." आपण सत्याची जोपासना असत्याचा स्वीकार करून नव्हे, तर त्याचा त्याग करून करतो.
God is "of purer eyes than to behold evil." We sustain Truth, not by accepting, but by rejecting a lie.
ज्या प्रमाणात जड वस्तू मानवी संवेदनांपुढे मनुष्याचे अस्तित्व गमावते, त्याच प्रमाणात मनुष्य तिचा स्वामी बनतो. तो तथ्यांच्या अधिक दिव्य जाणिवेत प्रवेश करतो आणि आजारी लोकांना बरे करणे, मृतांना जिवंत करणे आणि लाटांवरून चालणे या कृतींमधून प्रकट झालेले येशूचे धर्मशास्त्र समजून घेतो. या सर्व कृतींमधून येशूचे या विश्वासावरील नियंत्रण दिसून येते की, जड वस्तू हेच सार आहे, आणि ती जीवनाची निर्णायक किंवा अस्तित्वाच्या कोणत्याही स्वरूपाची रचनाकार असू शकते.
आपण असे कधीही वाचत नाही की लूक किंवा पौल यांनी रोगावर उपचार करण्याचा काही मार्ग शोधण्यासाठी त्याला वास्तविक मानले. येशूने कधीही विचारले नाही की रोग तीव्र आहे की दीर्घकाळ टिकणारा, आणि त्याने कधीही आरोग्याच्या नियमांकडे लक्ष देण्याची शिफारस केली नाही, कधीही औषधे दिली नाहीत, किंवा मनुष्याने जगावे अशी देवाची इच्छा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी कधीही प्रार्थना केली नाही. ज्याचे जीवन देव आहे, तो मनुष्य अमर आहे हे त्याने ओळखले होते, आणि त्याला माहित होते की मनुष्याला दोन जीवनं नाहीत, एक नष्ट होणारे आणि दुसरे अविनाशी बनवले जाणारे.
In proportion as matter loses to human sense all entity as man, in that proportion does man become its master. He enters into a diviner sense of the facts, and comprehends the theology of Jesus as demonstrated in healing the sick, raising the dead, and walking over the wave. All these deeds manifested Jesus' control over the belief that matter is substance, that it can be the arbiter of life or the constructor of any form of existence.
We never read that Luke or Paul made a reality of disease in order to discover some means of healing it. Jesus never asked if disease were acute or chronic, and he never recommended attention to laws of health, never gave drugs, never prayed to know if God were willing that a man should live. He understood man, whose Life is God, to be immortal, and knew that man has not two lives, one to be destroyed and the other to be made indestructible.
सत्याला चुकीची किंवा असत्याची जाणीव नसते. प्रेमाला द्वेषाची भावना नसते. जीवनाचा मृत्यूशी कोणताही संबंध किंवा भागीदारी नसते. सत्य, जीवन आणि प्रेम हे स्वतःहून भिन्न असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विनाश करणारे नियम आहेत, कारण ते केवळ ईश्वराचेच प्रकटीकरण करतात.
आजारपण, पाप आणि मृत्यू ही जीवनाची फळे नाहीत. त्या विसंगती आहेत ज्यांचा सत्य नाश करते. परिपूर्णता अपूर्णतेला चैतन्य देत नाही. ईश्वर चांगला आणि सर्व अस्तित्वाचा उगम असल्याने, तो कोणतीही नैतिक किंवा शारीरिक विरूपता निर्माण करत नाही; म्हणूनच अशी विरूपता वास्तविक नसून ती केवळ एक भ्रम किंवा चुकीच्या समजेचा मृगजळवत् आभास आहे. दैवी विज्ञान ही महान सत्ये उघड करते. याच सत्यांच्या आधारावर येशूने जीवनाचे स्वरूप सिद्ध केले आणि कोणत्याही स्वरूपातील असत्याची (किंवा चुकीच्या गोष्टीची) भीती न बाळगता किंवा त्याला न शरण जाता कार्य केले.
Truth has no consciousness of error. Love has no sense of hatred. Life has no partnership with death. Truth, Life, and Love are a law of annihilation to everything unlike themselves, because they declare nothing except God.
Sickness, sin, and death are not the fruits of Life. They are inharmonies which Truth destroys. Perfection does not animate imperfection. Inasmuch as God is good and the fount of all being, He does not produce moral or physical deformity; therefore such deformity is not real, but is illusion, the mirage of error. Divine Science reveals these grand facts. On their basis Jesus demonstrated Life, never fearing nor obeying error in any form.
पौल लिहितो: "ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवदायक आत्म्याच्या नियमाने मला पाप व मृत्यूच्या नियमापासून मुक्त केले आहे."
Paul writes: "The law of the Spirit of life in Christ Jesus hath made me free from the law of sin and death."
आपल्या गुरूने दुष्ट शक्तींना (अनिष्ट गोष्टींना) दूर केले आणि रोग्यांना बरे केले. त्यांच्या अनुयायांबाबतही हेच म्हटले गेले पाहिजे की, ते स्वतःमधील व इतरांमधील भीती आणि सर्व प्रकारची अनिष्टता दूर करतात तसेच रोग्यांना बरे करतात. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराच्या मार्गदर्शनाखाली चालते, तेव्हा ईश्वर त्या व्यक्तीच्या माध्यमातून रोग्यांना बरे करतो. ज्याप्रमाणे एकोणीस शतकांपूर्वी 'सत्य' असत्याचा (किंवा चुकीच्या गोष्टींचा) नायनाट करत असे, त्याचप्रमाणे आजही ते तितक्याच निश्चितपणे तसे करते.
Our Master cast out devils (evils) and healed the sick. It should be said of his followers also, that they cast fear and all evil out of themselves and others and heal the sick. God will heal the sick through man, whenever man is governed by God. Truth casts out error now as surely as it did nineteen centuries ago.
ईश्वराव्यतिरिक्त अन्य कोणतीही शक्ती नाही. सर्वशक्तिमान ईश्वराकडेच सर्व सामर्थ्य आहे आणि इतर कोणत्याही शक्तीला मान्यता देणे म्हणजे ईश्वराचा अवमान करणे होय.
There is no power apart from God. Omnipotence has all-power, and to acknowledge any other power is to dishonor God.
सिनाई पर्वतावरील गर्जना आणि 'डोंगरावरील प्रवचन' (डोंगरावरील प्रवचन) हे युगानुयुगे पुढे चालत राहून त्यांना गाठत आहेत; आपल्या प्रवासात ते सर्व चुकांचे खंडन करत आहेत आणि पृथ्वीवर स्वर्गाच्या राज्याची घोषणा करत आहेत. सत्य प्रकट झाले आहे. आता केवळ त्याची आचरणामध्ये अंमलबजावणी करणे बाकी आहे.
The thunder of Sinai and the Sermon on the Mount are pursuing and will overtake the ages, rebuking in their course all error and proclaiming the kingdom of heaven on earth. Truth is revealed. It needs only to be practised.
...“त्याच्या राज्याला अंत नाही,” कारण ख्रिस्त — जो देवाचा संकल्प आहे — तो अखेरीस सर्व राष्ट्रांवर व लोकांवर दैवी विज्ञानाद्वारे अनिवार्यपणे, पूर्णपणे आणि अंतिमरीत्या राज्य करेल.
…"of his kingdom there shall be no end," for Christ, God's idea, will eventually rule all nations and peoples — imperatively, absolutely, finally — with divine Science.
दैनिक कर्तव्यें
मेरी बेकर एडी यांनी
रोजची प्रार्थना
दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेलः "तुझे राज्य ये;" माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करु द्या; आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करु आणि त्यांच्यावर राज्य करु दे!
चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, विभाग. 4
हेतू व कृतींचा नियम
द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते; आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी.
चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, पंथ. 1
कर्तव्याची सतर्कता
आक्रमक मानसिक सूचनेविरूद्ध दररोज स्वत: चा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा .्या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.
चर्च मॅन्युअल, अनुच्छेद आठवा, विभाग. 6